राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील भिडे वाडा आणि फुले वाड्याच्या पाहणीसाठी भुजबळ आले आहेत. यासंदर्भात पाठपुरावा करत छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मिलिंद नार्वेकरांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत बोलताना मात्र भुजबळांनी सौम्य प्रतिक्रिया दिली.