तरुणाचे नग्नावस्थेतील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
श्रेयस संजय कवडे (वय १९, हिंजवडी, मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय २१, हिंजवडी, मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (३५, हडपसर, मूळ रा. लातूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
व्हिडिओच्या रागातून बाबा-मामाने मारलं
दुसरीकडे, ‘टिकटॉक’वर व्हिडिओ करीत असल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलीला तिचे वडील आणि मामानेच जीवे मारल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी उघडकीस आली.Nagpur Crime : मम्मी-पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते; पण पवनने माझा… १७ वर्षीय विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
संबंधित मुलीचे कुटुंब मूळचे बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथील असून, गेल्या २८ वर्षांपासून ते अमेरिकेत राहतात. या मुलीचा जन्मही अमेरिकेत झाला असून, ती तिथेच लहानाची मोठी झाली आहे. ती १५ जानेवारी रोजी पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी क्वेट्टा येथे आली होती. ती ‘टिकटॉक’वर व्हिडीओ करीत असल्याचे तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते.
Pune Crime : मित्राचे कपडे काढून प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स चोळलं, व्हिडिओ काढला अन्… हिंजवडीत खळबळ
‘टिकटॉक’ व्हिडीओ करण्यास विरोध
‘मुलीच्या वडिलांनी तिला ‘टिकटॉक’वर व्हिडीओ करण्यास मनाई केली होती. मात्र, ती ऐकत नव्हती. त्यामुळे तिचे वडील आणि मामाने गावी क्वेट्टा येथे गेल्यावर तिला मारून टाकण्याचा कट रचला,’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी आबाद बलोच यांनी दिली. आपल्या घराबाहेर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाल्याचा बनाव सुरुवातीला आरोपींनी केला होता.Honey trap : मी तुला मसाज शिकवतो, सराफाचा मेसेज; एअर हॉस्टेसने हनीट्रॅपमध्ये ओढलं, १५ लाख उकळले
बिहारमध्ये मुलीच्या प्रियकराची हत्या
बिहारमधील लखीसराय येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेला गावात एका प्रेमकथेचा भयावह अंत झाला आहे. २५ जानेवारीच्या रात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकर संदीपची तरुणीचे वडील धर्मराज रामने निर्घृण हत्या केली होती.