अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. पुण्यासह बारामतीतही अल्पवयीन मुलांकडून गंभीर प्रकार वाढताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याची दखल घेतली असून कठोर शासनाचे संकेत दिले आहेत. अल्पवयीन आरोपींकडून गंभीर गुन्हे घडल्यास कडक शासन झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रविवारी बारामतीत सांगितले.