विधानसभेतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यात आभार यात्रा सुरू केली आहे. शनिवारी (२५ जाने.) शिंदेंची जालना येथे आभार सभा पार पडली. या सभेला अर्जुन खोतकर, हिकमत उढाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेनंतर माध्यमांशी बोलताना खोतकरांच्या मंत्रिपदावर शिंदेंनी भाष्य केले.