• Mon. Jan 27th, 2025
    मुंबईकरांच्या खिशाला झळ; एसटीची १५ टक्के भाडेवाढ लागू, कोणत्या बससाठी किती रुपयांचे तिकीट? जाणून घ्या

    ST Bus Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा-टॅक्सी प्रवास पुढील शनिवारपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून महागणार असून रिक्षा प्रवासासाठी किमान २३ रुपयांचे भाडे २६ रुपये होणार आहे. तर टॅक्सी प्रवासाचे मीटर २८ ऐवजी ३१ रुपयांपासून चालू होईल.

    हायलाइट्स:

    • दादर-स्वारगेट शिवनेरी प्रवास ८० रुपयांनी महागला
    • रिक्षा-टॅक्सीचा प्रवास १ फ्रेब्रुवारीपासून महाग
    • रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांनी वाढ
    महाराष्ट्र टाइम्स
    st bus new3

    मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने १५ टक्क्यांची भाडेवाढ केल्याने प्रत्येक ६ किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान १ रुपया ३५ पैसे ते कमाल ३ रुपये ३५ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी दादर-स्वारगेट शिवनेरी प्रवास ८० रुपयांनी, तर मुंबई-कोल्हापूर साध्या श्रेणीच्या गाडीचा प्रवास ८९ रुपयांनी महागला. तसेच रिक्षा-टॅक्सींच्या किमान भाड्यातही ३ रुपयांनी वाढ होणार असून ही दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होईल.एसटी महामंडळातर्फे दरवर्षी ५ टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र ऑक्टोबर २०२१ पासून ही वाढ झाली नव्हती. राज्यभर एसटीच्या ५० हजार मार्गांवर सव्वा लाख किमीपेक्षा जास्त फेऱ्या होतात. या फेऱ्यांमध्ये एसटीला प्रतिकिमी ३.४१ रुपये तोटा होत आहे. त्यातच कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, वाढलेले इंधन व सुट्या भागांचे दर, यामुळे भाडेवाढ गरजेची होती. महामंडळाच्या संचालक मंडळाने त्याला मंजुरी दिली असून आता त्याची अंमलबजावणी होत असल्याचे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी स्पष्ट केले.
    दारुच्या नशेत ‘ट्रूथ अँड डेअर’, पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार, बाथरुममध्येच…
    मुंबईकरांचा रिक्षा-टॅक्सी प्रवास पुढील शनिवारपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून महागणार असून रिक्षा प्रवासासाठी किमान २३ रुपयांचे भाडे २६ रुपये होणार आहे. तर टॅक्सी प्रवासाचे मीटर २८ ऐवजी ३१ रुपयांपासून चालू होईल. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. परिणामी दर दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

    st bus fare

    सीएनजी दरवाढ झाल्याने मुंबई महानगरातील रिक्षा-टॅक्सी चालकांनी किमान तीन रुपयांच्या भाडेवाढीची मागणी केली होती. याबाबत गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यात रिक्षा-टॅक्सी-कूल कॅबच्या दरात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्ज व्याजदर या बाबींचा विचार करून ही दरवाढ करण्यात आली आहे.
    शिक्षक की हैवान? शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला; मुंब्य्रातील शाळेतील प्रकार
    ‘भाडेवाढ दरवर्षी गरजेची’
    ठाणे :
    ‘वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती, एसटी भाडेवाढ ही दरवर्षी होणे गरजेचे आहे,’ असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात स्पष्ट केले. डिझेल, सीएनजीचा दर वाढत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. त्यामुळे भाडेवाढ अटळ आहे,’ असे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed