Mumbai Auto Rickshaw and Taxi Fare Hike : मुंबईत बसनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडे वाढ करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.
दरम्यान, टॅक्सी आणि रिक्षाआधी बसच्या दरातही भाडे वाढ करण्यात आली आहे. मात्र महिलांना बसचं निम्म्या दरात तिकिटं मिळेल असं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. तसंच वृद्धांसाठी मोफत प्रवासाची तरतूद सुरूच राहणार आहे.
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे नवे रुग्ण, एकाचा मृत्यू, तर १३ व्हेंटिलेटरवर; लक्षणं काय? नागरिकांना घाबरुन जाऊ नये, उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन
किती किलोमीटरसाठी किती दरवाढ?
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) शुक्रवारी झालेल्या बैठकीत टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून नवीन भाडे वाढ लागू होणार आहे.
दीड किलोमीटर अंतरासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं आता २८ ऐवजी ३२ रुपये असेल. तर दीड किलोमीटर अंतरासाठी ऑटो रिक्षाचं भाडं आता २३ ऐवजी २६ रुपये असणार आहे.
डंपरने अचानक वळण घेतलं आणि आक्रित घेतलं, परीक्षेवरुन येताना काळाचा घाला, तरुणाचा चिरडून मृत्यू
१ फेब्रुवारीपासून लागू होणार नवे दर
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाने प्रवासी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ने मांडला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून ऑटो – टॅक्सी भाडं महाग होणार आहे.
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; किती किमीसाठी किती दरवाढ, पाहा नवे रेट
बसच्या दरातही १५ टक्क्यांची वाढ
दरम्यान, विधानसभेआधी महायुती सरकारने महिलांना निम्म्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिली होती. मात्र निवडणुकीनंतर बसच्या भाडे दरात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय विधानसभा निवडणुकीनंतर मात्र मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. मुंबईत बस दरवाढ नंतर आता टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्याही दरात वाढ झाली आहे.