Jalgaon Accident News : जळगावमध्ये भरधाव वाहनाने चिमुकलीला दिलेल्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर रस्त्यात डंपर पलटी, बाजूने जाणाऱ्या दोन तरुणी चाकाखाली आल्या आणि अनर्थ घडला; चिंचवडमध्ये दुर्देवी घटना
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास सुवर्णा संदिप पाटील या घरासमोरील विजय या दुकानात ताक घेण्यासाठी जात होत्या. दुकानात जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडून गेल्या. त्याचवेळी त्यांच्या मागे – मागे त्यांची दिड वर्षाची मुलगी प्रियांशी पळत पळत जात होती. ती भर रस्त्यावरुन आईच्या मागे पळत आली.
पुण्यातील बहीण-भाऊ केरळच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत; चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण समोर
भरधाव वाहनाने चिमुकलीला उडवलं
आईच्या मागे – मागे चिमुकली रस्त्यावर आली, त्याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाकडे जाणारी महिंद्र मॅझिमो MH-39-J-7424 या गाडीचा चालक पंकज अरुण धनगर रा. कमळगांव ता. चोपडा याने त्याची गाडी रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात पुढे आणली. या भरधाव गाडीची जोरदार धडक प्रियांशीला बसली आणि तिथेच अनर्थ घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या डोळ्यांसमोर लेकीने जीव सोडल्यानंतर आईचा टाहो तेथील उपस्थितांचं काळीज पिळवटून टाकत होता.
सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप, वॉचमनने हात लावताच फेकला गेला; इमारतीमध्ये अनर्थ घडला
वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
धडक मारुन गाडीचे पुढील आणि मागील उजव्या बाजूचे चाके प्रियांशीच्या अंगावर गेल्याने यात ती गंभीर जखमी झाली आणि यातच तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून चालक पंकज अरुण धनगर रा. कमळगांव ता. चोपडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत.