• Sun. Jan 26th, 2025
    सत्तेत जाणं हाच आता एक विचार झालाय, भाषणातून जयंत पाटलांचा महायुती सरकारला टोला

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byस्वप्निल एरंडोलीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2025, 9:04 pm

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते.क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन या संस्थेचा 39 वा वर्धापन दिवस होता. यावेळी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची मार्गदर्शन भाषणे झाली.आमदार जयंत पाटील यांनीही महायुती सरकारवर आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष टोला दिला. ते म्हणाले, सत्तेत बसलेले आणि बाहेर बसलेले लोकं काय करत आहेत हे जनतेला समजतं आहे. सत्तेत जाणं हाच आता एक विचार झाला आहे. समतावादी आणि समाजवादी धोरण सोडून…सत्तेत जाऊन जनतेचा सेवा करण्याचा नवा प्रकार वाढायला लागलाय, असंही ते म्हणाले. लढायच की शरण जायचं हे ठरवायची वेळ आहे, असंही म्हणत महायुतीला टोला लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *