• Wed. Jan 22nd, 2025
    बारामती जिल्हा होणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले त्या प्रस्तावाची कुठेही…

    Radhakrishna Vikhe Patil on Baramati : बारामती जिल्हा होण्याबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चावर भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक पडकर, बारामती : अनेक दिवसांपासून बारामतीसह अनेक तालुके जिल्हा होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अशा प्रकारच्या वावड्या कोण उठवत आहे माहित नाही. जिल्हा होणार संदर्भात कोणताही प्रस्ताव शासनापुढे नाही. मी अनेक वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केले आहे. ना त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे. ना जिल्हा अंमलबजावणीची चर्चा आहे. या सर्व बातम्या कपोल कल्पित आहे. याला काहीही अर्थ नाही, अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे टेंभुर्णी येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर मंगळवारी आले होते. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
    Pankaja Munde : बीडमध्ये तणाव, परळी बंद; पंकजा मुंडे म्हणतात – या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत

    पालकमंत्री पदाबाबत कुठेही नाराजी नाही

    पालकमंत्री पदाबाबत कुठेही नाराजी नाही. प्रत्येक नेत्याला असं वाटतं की, हा जिल्हा आम्हाला मिळावा. महायुतीमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात. शेवटी आमचा प्रपंच मोठा आहे. राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा जनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच अपेक्षा वाढलेल्या आहेत. यासंदर्भात तीनही नेते एकत्र बसून मार्ग काढतील, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
    खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो, पहाटेचा शपथविधी आठवा; माणिकराव कोकाटेंमुळे भर सभागृहात हशा पिकला

    पिक विमा बंद होणार नाही

    १ रुपयाचा पिक विमा बंद होणार असल्याबाबत विचारले असता विखे म्हणाले की, मला कळत नाही की कोण अशा वावड्या उडवत आहेत. शेतकऱ्यांसाठी एवढे मोठे बजेट येत आहे. १ रुपया पिक विम्याचा शेतकऱ्यांवर एवढा मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे पिक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. पूर्वी विमा कंपन्यांची घरे भरली जायची असा आरोप होत होता. आता उलटी परिस्थिती आहे. आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली आहे. राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झाली आहे.
    संतापजनक! परप्रांतीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठेवले डांबून, धक्कादायक घटनेने बारामती हादरली

    बारामती जिल्हा होणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले त्या प्रस्तावाची कुठेही…

    एकनाथ शिंदे नाराज नाहीत

    एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत विचारले असता विखे म्हणाले की, या सर्व बातम्या खोट्या आहेत. कोणीही नाराज नाही. शिंदे साहेब दरे या गावी गेले आहेत. ते काय नाराज म्हणून गेले आहेत काय…? ते नेहमी जात असतात. ते पहिल्यांदाच गेले असते तर नाराजीचा प्रश्न असता.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed