• Mon. Jan 20th, 2025
    उबाठाचे १५, काँग्रेसचे १० आमदार संपर्कात; शिंदेंच्या शिलेदारानं भूकंपाची तारीख सांगितली

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दावोस दौऱ्यावर गेले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दावोस दौऱ्यावर गेले आहेत. तर इकडे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात गेले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु असताना शिवसेना उबाठा, काँग्रेसच्या नेत्यांकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नव्या नेत्याचा उदय झाला. त्या नेत्यासोबत २० आमदार आहेत, असा दावा करत शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली. सामंत यांच्या मागे २० आमदारांचं बळ आहे. शिंदेंना याची माहिती मिळताच त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबावाची रणनीती बदलली आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली, असा सनसनाटी दावा राऊत यांनी केला.
    अपेक्षा करण्यात वावगं काय? शिंदेंचा सवाल; सर्वाधिकार CMना, दादांची फडणवीसांसाठी बॅटिंग
    यानंतर शिवसेनेच्या गोटातून माजी खासदार राहुल शेवाळेंनी मोठा दावा केला आहे. ‘काँग्रेस, उबाठाचे अनेक आमदार संपर्कात आहेत. उबाठाचे १५, काँग्रेसचे १० आमदार संपर्कात आहेत. हे दोन्ही पक्ष फुटू शकतात. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षांच्या होत असलेल्या अस्ताची काळजी करावी. २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळेच संजय राऊत, विजय वडेट्टीवार खोट्या बातम्या पसरवत आहेत,’ असं शेवाळे म्हणाले.

    Saif Ali Khan: कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोपीचा प्रयत्न फसला; सैफचा हल्लेखोर ‘दिसला’ अन् सगळा डाव फिस्कटला
    राऊतांच्या खळबळजनक दाव्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं स्पष्टीकरण दिलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेलेल्या सामंत यांनी एक व्हिडीओ जारी केला. ‘संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य ऐकलं आणि बघितलं. मला वाटतं हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला, त्यामध्ये मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनवेळा उद्योगमंत्रिपद मिळालं याची जाणीव आहे. सर्वसामान्य नेत्यानं राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केले, ते मी कधीही विसरू शकत नाहीत. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही’, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed