• Sat. Sep 5th, 2026
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होताच पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू, राजू बाविस्कर यांचा कंठ दाटला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.आपल्या आयुष्यातील अनुभव आणि कष्टकरी माणसांचे चित्रण या पुस्तकातून मांडले आहे.या पुस्तकातून कटुता न दाखवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.साहित्यिक मित्र जवळ असल्यामुळे मला चांगले पुस्तक वाचण्यास मिळाली असं बाविस्कर यांनी सांगितलं.चांगल्या माणसांची बेरीज करत गेलो त्याचा फायदा झाला असं बाविस्कर यांनी सांगितलं.नम्रता असेल तर तुम्हाला शिकता येतं आणि कलावंत घडतो असं राजू बाविस्कर यांनी सांगितलं.पुरस्कार जाहीर होताच पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते हे सांगताना राजू बाविस्कर यांचा कंठ दाटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed