• Thu. Mar 19th, 2026

    ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 18, 2026
    ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले.

    यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करता आले याचा अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारी, पंढरपूर, विठ्ठलाच्या आराधनेत पाहायला मिळते. इतक्या वेगवेगळ्या कथा, प्रत्येक वारीमध्ये तयार होतात. ते सर्व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहे, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती, इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. माहिती आणि छायाचित्रांमुळे कॉफी टेबल बुक संग्रहणीय झाले आहे. इन्टॅन्जिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही पंढरीची वारी सादर करण्यात येईल, यासाठी हे कॉफी टेबल बुक महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले.

    ०००

    प्रविण भुरके /स.स

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed