• Mon. Jan 20th, 2025
    मासे पकडण्यासाठी गेले आणि नको ते घडलं, एकाचा पाय जाळ्यात, तर दुसरा… नांदेड शहरात हळहळ

    Men Drown in Nanded : नांदेडमध्ये मासे पकडण्यासाठी तळ्यात गेलेल्या दोघांसोबत अनर्थ घडला आहे. कुटुंबावर शोककळा पसरली असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला. जाळं टाळण्यासाठी तळ्यात उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघ जण बुडाले. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील गडग्याळवाडी येथे शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. दोन तरुणापैकी संतोष हणमंतराव मामीलवाड (वय २७) यांचा मृतदेह सापडला असून अजित विश्वाबंर सोनकांबळे (वय २३) याचा रेस्क्यू टीमकडून शोध घेतला जात आहे.

    मुखेड येथील तरुण अजित विश्वाबंर सोनकांबळे (२३) आणि गडग्याळवाडीचा संतोष हणमंतराव मामीलवाड (२७) हे दोघे १८ जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता गडग्याळवाडी येथील तलावात जाळं घेऊन मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघेही कपडे, चप्पल आणि मोबाईल काढून तळ्याच्या काठावर ठेऊन पाण्यात उतरले. मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरा बेपत्ता झाल्याचं पुढे आलं आहे.
    जुना वाद जीवावर बेतला, संपूर्ण कुटुंबावर चाकू, कोयत्याने हल्ला; तरुणाच्या मृत्यूने जळगाव हादरलं
    घटनेची माहिती मृत तरुण संतोष हणमंतराव मामीलवाड यांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तलाव गाठून पोलिसांना कळवलं. तहसीलदार राजेश जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस कर्मचारी व्यंकट जाधव, रुकेश हासुळे, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. सदरील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केलं.
    Crime News : पाइपलाईनजवळ झुडपात बॉडी, ओला चालकाला दगडाने ठेचलं, भिवंडीतील घटनेने खळबळ

    Nanded News : मासे पकडण्यासाठी गेले आणि नको ते घडलं, एकाचा पाय जाळ्यात, तर दुसरा… नांदेड शहरात हळहळ

    या रेस्क्यू टीमकडून त्या दोन तरुणांचा सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत गडग्याळवाडी येथील रहिवाशी असलेला युवक संतोष हणमंतराव मामीलवाड याचा मृतदेह पाय मासे पकडण्याच्या जाळीत अडकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचा मृतदेह शवच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठवण्यात आला. मात्र त्याच्यासोबतचा दुसरा तरुण अजित सोनकांबळे याचा अद्याप पत्ता लागला नाही. सध्या ही शोधमोहिम थांबवण्यात आली असून सोमवारी पुन्हा सकाळपासून शोध मोहिम राबवण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेने सोनकांबळे आणि मामीलवाड कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed