Shivaji Park Dadar: दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून धूळ प्रदूषण होत असल्याबद्दल आयआयटीने मुंबई महापालिकेकडे अहवाल सादर केला आहे.
शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून, क्रिकेटच्या सरावासह सामनेही होतात. फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये मोठी वर्दळ असते. मैदानातील हिरवळ कायम राहावी, धूळ उडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने आठ- नऊ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात लाल माती टाकण्यात आली होती. मातीवर पाण्याची फवारणी करणे आणि हिरवळ फुलवण्यासाठीही पाण्याची गरज असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, तो प्रत्यक्षात कार्यान्वितच झाला नाही. त्यामुळे मैदानातील माती उडून रहिवाशांना धूळ प्रदूषणाचा त्रास होतो.
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांचा होणार खोळंबा; रेल्वेकडून मध्य-हार्बरवर उद्या ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द
धूळ प्रदूषणमुक्तीसाठी ‘स्मॉग टॉवर’ बसवण्याची संकल्पना समोर आली होती. शिवाजी पार्कात आठ ‘स्मॉग टॉवर’ बसवण्याचा महापालिकेचा विचार होता. मात्र, ही संकल्पना मागे पडली. शिवाजी पार्कमधील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मैदानातील हवेत उडणारी माती व्हँक्युमच्या साह्याने ट्रकमध्ये जमा करण्याचे कामही हाती घेण्यात आले. कालांतराने हे कामही थांबवण्यात आले. प्रदूषण रोखण्यासाठी मैदानातील सहा ते नऊ इंचापर्यंतची माती ‘जेसीबी’च्या मदतीने काढण्यात येणार होती. माती काढल्यानंतर पाणी फवारणी करून त्यावरून रोलर फिरवून मैदानातील उर्वरीत माती सपाट करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आयआयटीच्या अभ्यास अहवालानंतरच हा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते.
दिंडोरी संशयाच्या फेऱ्यात! फरार असताना वाल्मीक कराडचा मुक्काम, फूटेज जप्त, गुरुपीठाने फेटाळले आरोप
आयआयटीचा अहवाल सादर झाल्याची माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामध्ये माती न काढण्याची सूचना करण्यात आली आहे. माती न काढता त्यावर पाणी मारून रोलिंग केले जाणार आहे. त्यामुळे माती आणखी खाली बसेल. त्यानंतर मैदानात ज्या भागांतून माती हवेत उडून प्रदूषण होते, त्या-त्या भागात गवतरोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे माती उडणार नाही. सहा महिन्यांत टप्प्याटप्याने ही कामे सुरू राहणार आहेत.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस जाणार दावोसला; २० जानेवारीपासून जागतिक आर्थिक परिषद
आयआयटीकडून असा अहवाल अपेक्षित नाही. हा तांत्रिक मुद्दा नसून, हा विषयही आयआयटीचा नव्हता. त्यामुळे आयआयटीने दिलेल्या अहवालातून प्रदूषणुक्त शिवाजी पार्क होणार नाही. – प्रकाश बेलवाडे, शिवाजी पार्क सिटिझन्स फोरमचे सदस्य