• Sat. Jan 18th, 2025

    आई, बाबा कधी येणार? हातावर पोट असलेल्या शेतमजुरांवर काळाचा घाला, भरधाव टिप्परच्या धडकेत दोन ठार तर, एक गंभीर जखमी

    आई, बाबा कधी येणार? हातावर पोट असलेल्या शेतमजुरांवर काळाचा घाला, भरधाव टिप्परच्या धडकेत दोन ठार तर, एक गंभीर जखमी

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 18 Jan 2025, 12:02 pm

    Buldhana Accident News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गिट्टी दगडाने भरलेल्या भरधाव टिप्परच्या धडकेत दोन जण ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास वरवट बकाल ते शेगाव रस्त्यावरील जस्तगाव फाट्या नजीक घडली. यात पुंजाजी श्रीराम बावणे वय वर्ष ४८, संजय शालिग्राम बावणे वय वर्ष ५० दोन्ही राहणार मनसगाव, तालुका शेगाव. या शेतमजुरांचा मृत्यू झाला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमोल सराफ, बुलढाणा : शेतकरी किंवा शेतमजूर यांना दररोज आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक संकटांना तोंड देत आपली कामगिरी बजावावी लागते. ग्रामीण भागात घरापासून आपल्या शेतापर्यंत किंबहुना दुसऱ्याच्या शेतात काम करण्याकरिता कधी पायी, कधी दुचाकी, तर कधी मिळेल त्या वाहनाने तिथे पोहोचावे लागते. असाच प्रवास करत असताना दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली.

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गिट्टी दगडाने भरलेल्या भरधाव टिप्परच्या धडकेत दोन जण ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास वरवट बकाल ते शेगाव रस्त्यावरील जस्तगाव फाट्या नजीक घडली. यात पुंजाजी श्रीराम बावणे वय वर्ष ४८, संजय शालिग्राम बावणे वय वर्ष ५० दोन्ही राहणार मनसगाव, तालुका शेगाव. या शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर तिसरा जखमी ज्ञानेश्वर एकनाथ कोठे वय वर्ष ३६ हा मृत्यूशी झुंज देत असून, त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात वरील दोन मृतक व त्यांचा साथीदार शेगाव तालुक्यातील मनोजगाव येथील रहिवासी आहेत.

    तिघेही जण तूर सोंगणी च्या कामासाठी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम मनाडी येथे आले होते. दरम्यान दुपारी काम आटोपल्यानंतर हे तिघे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच २८ झेड १३ १७ ने घरी मनोजगा येथे जात असताना, वरवट बकालच्या दिशेने जात असलेल्या टिप्पर क्रमांक एम एच २६ ८७५ च्या चालकाने जोरदार धडक दिली .यात पुंजाजी यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. त्याचा चाकाखाली येऊन जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेला संजय बावणे याला उपचारासाठी शेगाव येथे नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला.

    तर तिसरा जखमी ज्ञानेश्वर एकनाथ कोठे याची सुद्धा प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी मृतकाचे नातेवाईक सीताराम बावणे यांनी खामगाव पोलीससात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी टिप्पर चालकावर कलम १०६, २८१, १२५, ३२४, ४२३ सह कलम १३४, १७७ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून टिप्पर जप्त केले. टिप्पर चे मालक कोण? याबाबत मात्र माहिती मिळाली नाही. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळ हळ व्यक्त केल्या जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed