Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम17 Jan 2025, 9:58 pm
बोगस पीक विम्याचे प्रकरण राज्यभर गाजत असताना रेणापूर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेनापुर तालुक्यातील हणमंतवाडी व काळेवाडी येथील तब्बल 200 शेतकऱ्यांच्या गटावर दुसऱ्याच व्यक्तीने पिक विमा भरल्याचे समोर आले आहे. यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले असून पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ नेमका घेतला कोणी असा सवाल उपस्थित होतो आहे. मागील वर्षीचा पिक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी अधिक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करा यावेळी बीड जिल्ह्यातील काही ठराविक लोकांची नावे समोर आली आहेत. या लोकांनी नांदेड धाराशिव यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विमा भरल्याचे निदर्शनास येते आहे.