Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड फरार असताना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रात आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तपासात उघड झाले आहे.
हायलाइट्स:
- संशयित कराड नाशिक जिल्ह्यात दोन-तीन ठिकाणी मुक्कामी होता; ‘लोकेशन’ बदलत होता
- कराड हा आश्रमात कोणाच्या मदतीने आला, कोणाला भेटला, याबाबत तपास सुरू
- संशयित कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा; पोलिसांनी दावा फेटाळला
- चाटे याने मोबाइल नाशिकमध्ये फेकला
- अद्याप तो मोबाइल सापडलेला नाही
मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…
दुसरीकडे सीआयडीच्या तपासात कराड हा दिंडोरीतील केंद्रात येऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तो १६ व १७ डिसेंबर रोजी केंद्रात मुक्कामी असल्याचे समोर येत आहे. ‘सीआयडी’ने पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. त्याने नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुक्काम केल्याची खात्रीलायक माहितीही समोर येते आहे.
प्रसिद्ध हॉटेल फोडलं, पण फक्त ३० रुपये हाती; मग चोरट्यांनी असं काही केलं की मालक शॉक, घटना CCTVमध्ये कैद
‘त्या’ व्हिडीओचे काय?
‘तुमचे आक्षेपार्ह व्हीडिओ व्हायरल करू’, अशी धमकी देत स्वामी समर्थ गुरुपीठ विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्याकडून एक कोटीची खंडणी मागितल्याचे नोव्हेंबर २०२३ मध्ये उघड झाले होते. त्या प्रकरणी निलंबित कृषी अधिकारी सारिका बापूराव सोनवणे (वय ४२), मुलगा मोहित सोनवणे (२५), महिलेचा भाऊ विनोद सयाजी चव्हाण (वय ४१, रा. देवळा) या संशयितांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. सारिकाच्या घरातून जप्त मोबाइल व लॅपटॉपमधील आक्षेपार्ह व्हिडीओची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी सुरू असल्याचा दावा नाशिक पोलिसांनी केला होता. त्या व्हिडीओतील व्यक्ती कोण आहेत, या संदर्भातील तपास अद्याप रखडलेला आहे.
भाऊ की वैरी? जुगारात गमावली पाच एकर जमीन; उधारी चुकविण्यासाठी बहिणीच्याच घरी डल्ला, पिंपरीतील घटना
गुरुपीठाचा दावा
‘१४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती होती. तेव्हापासून केंद्रात दत्त जयंती उत्सव सुरू होता. या काळात हजारो भाविक दर्शनासाठी आले. त्या वेळी आम्ही कोणालाही ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली नाही किंवा मुक्कामाची सोयदेखील केली नाही. सीआयडीचे पथक व तपास यंत्रणांनी २७ डिसेंबर रोजी केंद्रातील सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली. पथकांनी केंद्रात पाहणी केली. त्या वेळी सीसीटीव्ही फूटेज देण्यात आले. त्या फूटेजमध्ये कराड येऊन गेल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. मात्र, चाटे हा त्यांच्यासोबत नव्हता,’ असा दावा गुरुपीठाचे चंद्रकांत मोरे यांनी केला आहे.