• Sat. Jan 18th, 2025
    बीड प्रकरणात उज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रयत्न, पण काही लोकांकडून… मुख्यमंत्र्यांची टीका

    Santosh Deshmukh Murder Case Ujjwal Nikam : उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर होणाऱ्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर विरोध करणं म्हणजे गुन्हेगारांना मदत करणं, असं ते म्हणाले.

    Santosh Deshmukh Murder Case : बीड प्रकरणात उज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रयत्न, पण काही लोकांकडून… मुख्यमंत्र्यांची टीका

    जितेंद्र खापरे, नागपूर : बीड प्रकरणी सरकार उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर काही लोक राजकारण करत आहेत. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणं, याचा अर्थ गुन्हेगारांना कुठेतरी मदत करणं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    बीड प्रकरणी वकिलांच्या नियुक्तीबाबत काय म्हणाले फडणवीस?

    उज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत फडणवीस यांनी सांगितलं की, उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उज्वल निकम यांनाही यासंदर्भात विनंती केली गेली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास ही यावेळी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
    Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पोलिसांना अनेक सुगावे…
    मात्र उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर काही लोक राजकारण करत आहेत. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणं, याचा अर्थ गुन्हेगारांना कुठेतरी मदत करणं आहे. त्यांनी केस घेतली तर आहे, त्यात खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होते, असा उज्वल निकम यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे. जर कुणाला वाचवायचं असेल, तरच उज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध केला जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
    आईसोबत ट्यूशनला निघालेली, मागून टिप्परने फरफटत नेलं; आईच्या डोळ्यासमोर चिमुकलीचा अंत
    खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो, पहाटेचा शपथविधी आठवा; माणिकराव कोकाटेंमुळे भर सभागृहात हशा पिकला
    पुढे बोलताना ते म्हणाले की, बीड प्रकरणातील राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजं. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहेत, आणि कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही, असं ते म्हणाले. फडणवीस यांनी तपास यंत्रणांना दबाव न आणता त्यांना त्यांचं काम करु दिलं पाहिजे आणि तपास यंत्रणा योग्य काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

    Santosh Deshmukh Murder Case : बीड प्रकरणात उज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रयत्न, पण काही लोकांकडून… मुख्यमंत्र्यांची टीका

    सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री –

    सैफ अली खानवरील हल्ल्यावरील संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत आणि पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील. पोलिसांकडे आवश्यक माहिती आहे, आणि ते त्यावर काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed