CM Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना याप्रकरणी महिती दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस…
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं, की या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबतची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांना अनेक सुगावे लागले असून मला वाटतं पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावतील.
आपको क्या चाहिये? सैफच्या मेडचा सवाल, हल्लेखोराकडून एक कोटींची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने अभिनेत्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्यावर चोरट्याने धारदार शस्त्राने अनेक वार केले. यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. चोराने सैफच्या छातीवर, मानेवर, हातावर सहा वेळा हल्ला केला. मध्यरात्री सैफला तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची तब्येत बरी असून तो धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास
आरोपीला पकडण्यासाठी १० टीम सज्ज
सैफवर हल्ला केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या क्राईमच्या १० टीम सज्ज करण्यात आल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. तसंच आरोपी सैफ राहत असलेल्या इमारतीच्या पायऱ्यांवरुन उतरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाला आहे. या फुटेजवरुन पोलिसांचा पुढील तपास सुरू असून सैफकडे काम करणाऱ्यांकडे याप्रकरणी चौकशी केली जात आहे.
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पोलिसांना अनेक सुगावे…
दिल्लीत भाजपचं सरकार…
दिल्ली विधानसभा निवडणुकीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, की दिल्लीतील लोकांचा अरविंद केजरीवाल यांच्यावरील विश्वास उडाला आहे. आता तेथील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला निवडून देतील. त्यामुळे दिल्लीत आता भाजप सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.