Anil Deshmukh On Santosh Deshmukh Murder Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालतेय असंच चित्र समोर येत असल्याचं ते म्हणाले.
देशमुख यांनी शुक्रवारी बारामतीत कृषिक प्रदर्शनाला भेट देत पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली गेली ते पाहता जो कोणी दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कारवाई होण्यासाठी गृह विभागाने महिना-सव्वा महिन्याचा कालावधी घालवला. त्यामुळे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतेय का? असे चित्र महाराष्ट्रासमोर आलं आहे.
राज्याच्या राजकारणात आठ दिवसात भूकंप; ठाकरे गटातून खूप मोठा पक्षप्रवेश…उदय सामंत यांचं मोठं विधान
आता सीआयडी, एसआयटी अशा यंत्रणांकडून चौकशा सुरू आहेत. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर लवकर कारवाई व्हावी, जेणेकरून जनतेचं समाधान होईल. वाल्मिक कराड याच्या नावे असलेल्या संपत्तीची रोज नवी प्रकरणं समोर येत आहेत, यासंबंधी इडीकडून कारवाई व्हायला हवी का? या प्रश्नावर ते म्हणाले, खरं तर हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना सरकारकडून उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. मात्र उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर काही लोक राजकारण करत आहेत, याचा अर्थ गुन्हेगारांना कुठेतरी मदत करणं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
Santosh Deshmukh Murder Case : बीड प्रकरणात उज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रयत्न, पण काही लोकांकडून… मुख्यमंत्र्यांची टीका
सरकारच गुन्हेगाराला पाठीशी घालतेय असंच चित्र जनतेसमोर, संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनिल देशमुखांची टीका
कृषिक ही भविष्यातील शेतीची दिशा देणारे भारतातील सर्वात चांगले प्रदर्शन – आमदार सुरेश धस
शुक्रवारी सकाळी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतीतील सर्व काही पाहण्यासाठी बारामतीतच यायला हवे. भविष्यात शेतीसाठी काय महत्त्वाचे आहे याची माहिती येथे काळाची पाऊलं ओळखून दिली जाते, याचा प्रत्यय या निमित्ताने आला. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे प्रदर्शन अतिशय महत्त्वाचं असून महाराष्ट्रातील शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयोगी ठरणार आहे.