Kumar Ailani Son Death : धीरज आयलानी हे उल्हासनगर शहरातील प्रख्यात उद्योजक होते. त्यांच्या निधनाने आयलानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
कुमार आयलानी कोण आहेत?
कुमार आयलानी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी आमदारकी भूषवली. २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. मात्र २०१९ आणि यंदा २०२४ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर आमदारपदी निवडून आले आहेत.
गेल्या काही काळापासून मुंबईतील रुग्णालयात धीरज आयलानी यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भाजप आमदार गायकवाड यांच्याकडून श्रद्धांजली
भारतीय जनता पक्षाच्या कल्याण मतदारसंघाच्या विधानसभा आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. “उल्हासनगरचे आमदार कुमारजी आयलानी यांचे सुपुत्र, समाजसेवेसाठी सतत तत्पर असणारे उद्योगपती धीरज कुमार आयलानी यांच्या आकस्मिक निधनाच्या दु:खद बातमीने मन हेलावून गेले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचाच नव्हे, तर समाजाचाही मोठा तोटा झाला आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Uddhav Thackeray : पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत? ‘मातोश्री’वर जाऊनही भेटत नाहीत, बडा नेता नाराज
राहत्या घरातून अंत्ययात्रा
दरम्यान, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प तीन येथील सपना गार्डन परिसरात असलेल्या आयलानी यांच्या निवासस्थानाहून धीरज आयलानी यांची अंत्ययात्रा निघणार आहे. शांतीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती आयलानी कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.