• Sun. Jan 19th, 2025
    बारालिंग यात्रेत मुलीची छेड काढली, दोन गटात मोठा वाद अन् वातावरण तापले; नांदेडात तणाव

    Nanded News : जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग यात्रेत बुधवारी रात्री राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. पोलिसांच्या वाहनावर आणि शहरात दगडफेकही करण्यात आली. यामुळे तामसामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग यात्रेत बुधवारी रात्री राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. पोलिसांच्या वाहनावर आणि शहरात दगडफेकही करण्यात आली. परिणामी तामसा मध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन्ही गटातील ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    बुधवारी तामसा येथे बारालिंग यात्रा पार पडली. ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर यात्रेदरम्यान भाजी भाकरची पंगत भरवण्यात आली होती. याच गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी मुलींची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला. यावरुन तरुणांच्या दोन गटात वाद झाला. यात्रेला गालबोट लागू नये म्हणून तो वाद तेथेच मिटवण्यात आला. परंतु रात्री उशीरा जुन्या गावातील रस्त्यावर मोटारसायकल अडवून त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य शाकीर पठाण उर्फ इरफान खान पठाण यांचे डोके फुटल्याची माहिती आहे. याच दरम्यान तामसा होळीगल्ली, डॉ. हेडगेवार मार्केट, आठवडा बाजारातून तुफान दगडफेक झाली.
    Jalgaon News : उपचारासाठी डॉक्टरकडे निघाले, पण तो प्रवास अर्ध्यावरच संपला; ट्रकची भीषण धडक आणि अनर्थ घडला
    पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्यांच्याही गाडीवर दगदफेक करण्यात आली. परंतु पुढे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे होणारा अनर्थ टळला. आठवडी बाजारात जमलेल्या जमावाने तामसा जुने बसस्थानक चौकात दगडफेक केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मध्यरात्रीनंतर पोलीस राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. याप्रकरणी मारहाणीत चारजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करीत शांततेचे आवाहन केले.

    बंद पाळून व्यापाऱ्यांकडून निषेध

    याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनेकजण फरार आहेत, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, तामसा येथील समाजकंटकांनी व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक करून केलेल्या नुकसानीच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवून आरोपींना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन तामसा पोलिसांना देण्यात आले. अनेक पालकांनी भीतीपोटी पाल्यांना शाळेत न पाठवल्याने शहरातील शाळा भरल्याच नाहीत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed