• Wed. Jan 15th, 2025
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    शहापूर जवळ 5 वाहनांचा विचित्र अपघातात 3 ठार 14 जखमी

    कसारा : मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघर नजिक झालेल्या विचित्र अपघातात 3 जण ठार झालेत तर 14 जन जखमी झाले.
    आज पहाटे 3.50 च्या सुमारास भरधावं वेगात असणाऱ्या एका कटेनर वरील चालकाचा गाडी वरील ताबा सुटला व कटेनर ने समोर असलेल्या 3 वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बस ला धडक दिली. या विचित्र अपघातात 3 बस प्रवासी मयत झाले असून त्यात 2 महिला व 1 पुरुष यांचा समावेश आहे. तर, 14 जण जखमी झाले असून त्या पैकी 8 जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 6 जण शहापूर येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, जखमी ट्रक,टेम्पो,बस,मधील असून अपघताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे ,महामार्ग पोलीस केंद्र च्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरु करीत, जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed