सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलाय. मंगळवारी (१४ जाने.) कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र यानंतर कराड समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच कराडच्या पत्नी मंजली कराड यांनी सुरेश धसांवर आरोप केले आहेत. SIT प्रमुख बसवराज तेली व धसांचे सीडीआर काढा अशी मागणी मंजली कराडांनी केलीय. तसंच वाल्मिक कराड प्रामाणिक असून त्यांना अडकवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.