Walmik Karad News : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल होताचा परळीमध्ये १० मिनिटामध्ये त्याच्या समर्थकांनी बंद केला आहे. इतकंच नाहीतर कराडचे समर्थक आक्रमक झाले असून त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहेत.
परळी शहरांमध्ये बस वरती दगडफेक आणि प्रमुख रस्त्यांवरती टायर जाळून रस्ते बंद करण्यात आलेत. राजकीय नेते आणि समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले आहे. यामध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं. वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घ्या अशी समर्थकांनी मागणी केली. परळी शहरातील मुख्य रस्ते वरती टायर जाळून आंदोलन करण्यात आलेत. परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते परळी तालुक्यातील बस सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे.
वाल्मिक कराड यांच्या आई पारूबाई कराड यांना आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान त्यांना भोवळ आली होती. काही वेळाने त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र पाणीसुद्ध घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचीसुद्धा प्रकृती खालावत चालली आहे.
रूग्णालयातच कराडचा मुक्काम?
केज न्यायालयातून वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. तपासणी दरम्यान त्यांची तब्येत खालावल्याचं दिसून आल्याने सध्या वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांचा आजचा मुक्काम हा बीड जिल्हा रुग्णालयामध्ये असू शकतो. उद्या (बुधवारी) त्यांना केज न्यायालयासमोर हजर असल्याचे समजत आहे