• Wed. Jan 15th, 2025

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, तीन युद्धनौका आणि पाणबुड्यांचे राष्ट्रार्पण

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, तीन युद्धनौका आणि पाणबुड्यांचे राष्ट्रार्पण

    राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी नौदलासाठी तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केले आहे. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौकांचे लेखी राष्ट्रार्पण करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध अधिकारीही उपस्थित होते.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच मोदी यांच्या हस्ते दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण होणार आहे.

    राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपला मोठे यश मिळाले. आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता मुंबईतील नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचे, तर आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

    एकाचवेळी नौदलासाठी तीन युद्धसज्ज जहाजांचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी १५ जानेवारीला करणार आहेत. नौदलाच्या इतिहासातील ही मोठी यशोगाथा असेल. एक विनाशिका, एक फ्रिगेट व एका पाणबुडीचे येथे कमिशनिंग होईल.

    माझगाव डॉक शिपबिल्र्डस लिमिटेड कंपनीच्या गोदीत ‘प्रकल्प १५. ब’ अंतर्गत चार विनाशिका, ‘प्रकल्प १७ अ’ अंतर्गत चार फ्रिगेट्स व प्रकल्प ७५’ अंतर्गत सहा पाणबुड्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार ‘प्रकल्प: १५ ब’मधील चौथी व अखेरची विनाशिका, प्रकल्प १७ अ मधील पहिली फ्रिगेट व प्रकल्प ७५ मधील सहावी व अखेरची पाणबुडी एकाचवेळी नौदलाकडून ताफ्यात सामावून घेतली जात आहे. त्याचा दिमाखदार कमिशनिंग सोहळा नौदल पंतप्रधानांच्या हस्ते गोदीत सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

    ‘प्रकल्प १५ ब’ अंतर्गत ‘आयएनएस विशाखापट्टणम श्रेणीतील ‘आयएनएस सुरत’, ‘प्रकल्प १७ अ’ अंतर्गत ‘आयएनएस निलगिरी (ही नवीन श्रेणी या युद्धनौकेपासून सुरू होत आहे) व ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत ‘आयएनएस कलवरी’ श्रेणीतील ‘आयएनएस वाचशीर चे कमिशनिंग होत आहे. हे तिन्ही युद्धसज्ज जहाज ‘स्टेल्थ

    एकाचवेळी तीन युद्ध जहाजांच्या कमिशनिंगया हा सोहळा न भूतो न भविष्यती असा आहे. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः येत असल्याने म्हणजेच कुठल्याही रडारमध्ये टिपल्या न जाणाऱ्या तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. तसेच विविध प्रकारची अत्याधुनिक प्रणाली आणि अत्याधुनिक रडार यावर आहेत. ७५ टक्के आत्मनिर्भर असलेली ही जहाजे आहेत. पाणबुडीची उभारणी फ्रेन्च डीसीएनएस कंपनीच्या स्कॉर्पिन पाणबुडी तंत्रज्ञानावर आधारित झाली आहे. मात्र ही अखेरची पाणबुडी फ्रान्सच्या तंत्रज्ञांच्या देखरेखीविना उभी झाली आहे. हे विशेष.

    मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील मांदियाळी या सोहळ्यासाठी उपस्थित होत आहे. केवळ मंत्र्यांचा आकडा ३०च्या घरात असून अन्य लोकप्रतिनिधी, मोठे बहुराष्ट्रीय उद्योजक, केंद्र व राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी, नौदल अधिकारी, माझगाव डॉकचे अधिकारी, विविध देशांच्या वाणिज्य दुतावासातील अधिकारी अशा सर्वांसह निमंत्रितांचाच आकडा २००हून अधिक आहे. या सर्वांमध्ये सैन्यदले प्रमुख अनिलकुमार चौहान व नौदलप्रमुख अडमिरल आर. हरिकुमारही उपस्थित असतील.

    संरक्षणाच्या जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल

    ‘१५ जानेवारी हा आपल्या देशाच्या नौदल क्षमतेच्या दृष्टीने विशेष दिन ठरणार आहे. नौदलाच्या तीन युद्धसज्ज जहाजांचे एकाचवेळी कमिशनिंग होणे ही संरक्षणाच्या जागतिक नेतृत्त्वाकडे तसेच स्वयंपूर्ण होण्याच्या दिशे होणारी एक सक्षम वाटचाल आहे’, असे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नौदलाने तयार केलेल्या एका ध्वनिचित्रिफितीला ‘कोट री-पोस्ट’ करीत पंतप्रधानांनी हे प्रतिपादन केले आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed