• Tue. Jan 14th, 2025
    राज्यातील ‘या’ १० बंदरांना जोडणार २३५०० कोटींचे रस्ते; कोणत्या प्रकल्पासाठी किती खर्च? जाणून घ्या

    Mumbai News: राज्यातील दहा लघु बंदरांसाठी एकूण ५१९.८६ किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे जवळपास २३ हजार ५८३.८५ कोटी रुपये खर्चून उभे करणे प्रस्तावित आहे.

    हायलाइट्स:

    • दहा बंदरांना मिळणार संलग्नता
    • एकूण ५२० किमीचा समावेश
    • एनएचएआयकडून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू
    महाराष्ट्र टाइम्स
    port road

    मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी विविध प्रकारच्या रस्त्यांचे जाळे विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील दहा लघु बंदरांसाठी एकूण ५१९.८६ किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे जवळपास २३ हजार ५८३.८५ कोटी रुपये खर्चून उभे करणे प्रस्तावित आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) हा प्रकल्प हाती घेतला आहे. अशा १६ प्रकल्पांचा बृहत्‌ प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम एनएचएआयने सुरू केले आहे.याअंतर्गत जयगड, धरमतर, करंजा, कोरलाई, मांडवा, रेडी, सानेगाव, विजयदूर्ग, राजापूरी व दिघी या बंदरांचा समावेश आहे. या बंदरांना जोडण्यासाठी काही ठिकाणी नवे रस्ते तयार होणार आहेत, तर काही ठिकाणी सध्याच्या रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यापैकी सर्वात मोठा प्रकल्प हा तब्बल ५४०४.६० कोटी रुपयांचा आहे. त्यामध्ये राजापुरी व दिघी बंदर हे पुण्यातील इंदापूरशी जोडले जाणार आहे. तर ५,१३७.६७ कोटी रुपये खर्चून दिघी व राजापुरी, या दोन्ही बंदरांना जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांचे सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये आगारदांडा धक्क्यालाही जोडले जाणार आहे. याशिवाय अन्य एक प्रकल्प १९३७.७५ कोटी रुपयांचा आहे. त्याअंतर्गत निवळी ते जयगड बंदरादरम्यान असलेल्या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग १७मध्ये परावर्तित केले जाणार आहे. यामुळे सध्या दुहेरी असलेला हा रस्ता चारपदरी होणार आहे.
    सर्वाधिक रस्ते राजापुरी व दिघी बंदरासाठी तयार होत आहेत. त्यामध्ये २५६.२९ किमीचे रस्ते १३ हजार ६६७.८७ कोटी रुपये तयार करणे प्रस्तावित आहे.

    राज्य सरकारच्या विनंतीनुसार, लघु बंदरांना जोडणारा हा प्रकल्प आहे. त्यातील या सात बंदरांना जोडणाऱ्या या विविध रस्त्यांसाठी एकूण ५१९.८६ किमी लांबीचे रस्ते तयार होणार आहेत. त्यांचा एकूण प्रकल्पखर्च २३ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या खर्चासह डीपीआर तयार होत आहे. हे काम एनएचएआयच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयांतर्गत पनवेल विभाग कार्यालयाद्वारे होत असल्याचे ‘एनएचएआय’मधील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
    Nashik News: रात्री गॅलरीत गेला, कंबरेचा ब्लेट काढला अन्…, नववीच्या विद्यार्थ्याचा धक्कादायक निर्णय, काय घडलं असं?
    महत्त्वाचे प्रकल्प असे…

    नाव बंदराला लाभ किमी प्रकल्पखर्च (कोटी रुपयांत)
    इंदापूर (पुणे) दिघी रस्ता राजापुरी/दिघी ९६.०२ ५४०४.६०
    दिघी-आगरदांडा रस्ता रुंदीकरण राजापुरी/दिघी ९७.६० ५१३७.६७
    जयगड-निवळी रस्ता रुंदीकरण जयगड ४०.३ १९३७.७५
    विजयदुर्ग-तलारे रुंदीकरण विजयदुर्ग ५०.०७ १८६५.५६
    कोरलाई-कोलाड रस्ता रुंदीकरण कोरलाई ४५.८० १७३६.१७
    सानेगाव-वाकण-कोलाड रस्ता रुंदीकरण सानेगाव ३४.५९ १४२६.३३
    मांडवा-अलिबाग रस्ता रुंदीकरण करंजा १८.५० १३१६.१०

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed