Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. सोने-चांदीचे दागिने विक्री व घडणावळीचे काम करणाऱ्या कुटुंबातील बापलेकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काळाराम मंदिर परिसरातील रामराज्य संकुलात घडली. प्रशांत आत्माराम गुरव (वय ४९) व अभिषेक गुरव (वय २९) असे मृत बापलेकाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अभिषेकच्या आत्यालादेखील चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंतानजक असून, प्रशांत व अभिषेकच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. ही घटना समजल्यानंतर अभिषेकची पत्नीही अत्यवस्थ झाली आहे. एकूणच बापलेकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
३. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुली या खूप लहान आहेत. त्यामुळे त्या प्रकरणाचा खटला शीघ्रगती न्यायालयात चालवायला हवा आणि खटल्याची सुनावणीही जलदगतीने पूर्ण व्हायला हवी. त्यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. बदलापूरमध्ये सुमारे चार वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याविषयी शाळेतील संबंधित शिक्षकांना व प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतरही तत्परतेने गुन्हा नोंदवण्यात आला नाही आणि पोलिसांकडून कारवाई झाली नाही.
४. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या बंगल्यातील गॅलरीत कंबरेच्या बेल्टने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कॉलेजरोड परिसरातील कृषिनगरात घडली. आयुष प्रदीप पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, गंगापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू नोंदवण्यात आला आहे.
५. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. आता देशमुखांच्या हत्येला एक महिना होऊन गेला असून अद्याप एक आरोपी फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल आहे. कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी याप्रकरणात केली आहे.
६. प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या जाचास कंटाळून अर्चना गोरे (वय २८, रा. गजानन इस्टेट, बनकर मळा) या विवाहितेने राहत्या घराच्या बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. तिचा भाऊ ऋषिकेश खांडरे (रा. लोहारे मिरपूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानागर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकर शिवा भिमाजी तेलंग आणि त्याची पत्नी सारिका तेलंग यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिसांत अर्चनाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर…
७. भरधाव जाणाऱ्या अज्ञात चारचाकी कारने आठ वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना सोयगाव मुख्य रस्त्यावर घडली. आदित्य पाल असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. टेहरे चौफुली ते सोयगाव चर्च रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून करीत आहेत. परंतु, ही मागणी पूर्ण न झाल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बालकाला नाहक जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे. बातमी वाचा सविस्तर…
८. राम कपूर सध्या त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याने त्यांचं वजन खूप कमी केलं असून तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. अशातच राम कपूर यांनी अलीकडेच राखी सावंतचं कौतुक केलं असून, तिने कोणत्याही गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलंय, असं म्हटलं आहे.
९. भारताचा माजी क्रिकेटपटू योगराज सिंग त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ते अलीकडेच YouTuber समदीश भाटियाच्या पॉडकास्टवर दिसले. या पॉडकास्टवर त्यांनी चक्क धोनीचे कौतुक केले तर कपिल देव यांना खरे खोटे सुनवाले. यासह ते पाॅडकास्टवर आपल्या लव्ह लाईफबद्दलही बोलले.
१०. अमेरिकी अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असताना आता जागतिक महासत्ता असलेल्या देशातून जगाला धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत दिवाळखोर कंपन्यांच्या संख्येने गेल्या काही वर्षात रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये देशात दिवाळखोरीत निघालेल्या मोठ्या कंपन्यांची संख्या १४ वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून या काळात ६९४ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या, जे २०१० नंतरचे सर्वाधिक आहे.