मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असून आज सीआयडी कोठडी संपणार आहे. आज केज न्यायालात सुनावणी होणार आहे. धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केलीये.
आज केले जाणार न्यायालयात हजर
खंडणीच्या गुन्हानंतर वाल्मिक कराड हा काही दिवस फरार होता. त्यानंतर त्याने थेट पुण्यात सीआयडीचे मुख्यालय गाठून आत्मसमर्पण केले. पुण्यातून आणून केज न्यायालयात कराडला हजर करण्यात आले असता त्याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. आता आज वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायायलात हजर केले जाणार आहे. आज यावर महत्वपुर्ण सुनावणी होईल.
धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, ग्रामस्थही आक्रमक; मस्साजोगमध्ये पोलीस अधीक्षकांसह फौजफाटा, नेमकं काय घडतंय?वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना सीआयडीकडे
सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली हे आज बीडमध्ये आहेत. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे. याप्रकरणात हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे. एकीकडे हत्या प्रकरणात तपास सुरू आहे तर दुसरीकडे खंडणी प्रकरणी तपास सुरू आहे. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडी न्यायालयाने सुनावली होती. आवाजाचा नमुना महत्वाचा पुरावा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना CIDकडे, महत्त्वाचे धागेदोरे हाती? कोर्टात केले जाणार हजर, घडामोडींना वेग
बसवराज तेली बीडमध्ये दाखल
दोन कोटी खंडणी प्रकरणाच्या तपासात वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना घेण्यात आलाय. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आता कोर्टात आज नेमके काय घडते याकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळतंय. काल धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, त्यांचे समाधान झाले नाहीये. आज धनंजय देशमुख हे दुपारी बसवराज तेली यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.