दापोली तालुक्यातील ताडील गावातील शिवसेना शाखाप्रमुख नैलेश चंद्रकांत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे काम केल होते. त्याच्यावर ज्या प्रभागाची जबाबदारी होती तिथून योगेश कदमांना चांगलं मताधिक्यही दिलं होतं. मतदार संघात अनेकांचे लाडके असलेले योगेशदादा हे आमदार झाले इतकंच नाही तर ते राज्यमंत्रीही झाले. या सगळ्या आनंदसोहळ्यातही नैलेश हा सहभागी झाला होता त्यांनी आपल्या लाडक्या योगेशदादांची भेटही घेतली होती. त्यांचं अभिनंदनही केलं त्यानंतर निघालेल्या मिरवणुकीतही तोही सहभागी झाला होता. या सगळ्या आनंदात असतानाच आता या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन दिवसांपूर्वी नैलेश याला अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे नैलेश याला तातडीने दापोली शहरातील एका खाजगी उडाल्यात दाखल करण्यात आलं होतं त्याला हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. पुढील उपचारासाठी तातडीने मुंबई येथील पार्ला परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गावातीलच असलेले शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते राजू बोथरे यांनीही त्याच्याकरता धावपळ केली होती. या सगळ्या दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी चव्हाण कुटुंबीयांच्या मदती करता संपर्कात होते.
मुंबई येथीलही रुग्णालयातही ते संपर्क ठेवून त्याची विचारपूस करत होते. मात्र उपचारादरम्यान नैलेश याला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे चव्हाण कुटुंबीयांना हा गेल्या काही वर्षात तिसरा धक्का आहे. नैलेश याच्या वडिलांचे ही काही महिन्यांपूर्वी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. नैलेश याच्यावर ताडील गावी मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नैलेश या तरुण खांद्या कार्यकर्त्याच्या निधनामुळे दापोली मतदारसंघातील शिवसेना परिवारावर शोककळा पसरली आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आला असून शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही आपला तरुण कार्यकर्ता गमावल्याचे दुःख व्यक्त केलं आहे.