• Mon. Jan 13th, 2025

    ब्लॅक टोमॅटो शेतीचा अनोखा प्रयोग बारामतीत यशस्वी; ३० प्रकारच्या देशी टोमॅटोची अफलातून शेती

    ब्लॅक टोमॅटो शेतीचा अनोखा प्रयोग बारामतीत यशस्वी; ३० प्रकारच्या देशी टोमॅटोची अफलातून शेती

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2025, 6:56 pm

    जे पिकतं तेच विकतं हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे विकतं ते पिकवलं जातं हे दाखवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अनोखी शेती करण्याचा प्रयोग दरवर्षी केला जातो. आता हेच बघा… हे एकदम काळं किंवा जांभळं झालेलं फळ तुम्हाला पाहिल्यानंतर वांग वाटेल… पण नाही… हे वांग नसून काळा टोमॅटो आहे… होय तुम्ही बरोबर ऐकलंय…. आपल्याला सुरवातीला कच्चा हिरवा टोमॅटो आणि नंतर तो लालेलाल झालेला पाहण्याची सवय आहे. मात्र एकदम काळा किंवा जांभळा टोमॅटो असतो असे सांगितले तर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही आणि त्यातही असा काळा टोमॅटो हा आपला भारतीय वाण आहे असे म्हटल्यावर नाहीच नाही.. मात्र आपल्याकडीलच शेतकऱ्यांनी जपून ठेवलेली देशी वाणांची कितीतरी प्रकारची पिके बारामतीच्या मातीत उगवली आहेत. काळा टोमॅटो, खाचा असणारा टोमॅटो, हाताच्या मुठीसारखा आकार असणारा टोमॅटो, लंबगोलाकार टोमॅटो अशी २९ प्रकारची टोमॅटोची जात या ठिकाणी तुम्हाला याची देही याची डोळा पाहायला मिळेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed