भाजपाचे राज्यस्तरीय महाधिवेशन शिर्डीत पार पडले.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह शिर्डीत आले होते.यावेळी त्यांनी साई दरबारी हजर लावत साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला.दर्शनानंतर मंदिराबाहेर येत असताना साई भक्तांनी एकच गर्दी केली होती.यावेळी वाहनांमध्ये बसताना अमित शाहांनी उपस्थित साई भक्तांना अभिवादन केले.