Ajit Pawar : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत किती वेळा तेच तेच सांगायचे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा टोलविला.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे मुंडे यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. अजित पवार हे मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही होत आहे. या पार्श्वभूमीवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता पुन्हा फेटाळून लावली.
सेमी हायस्पीड रेल्वे धावणारच! ‘पुणे-नाशिक’बाबत रेल्वेमंत्र्यांची माहिती; ‘जीएमआरटी’ला धक्का नाही
‘वाल्मिक कराड याची ‘एसआयटी’, ‘सीआयडी’कडून चौकशी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले आहे. दोषींवर निश्चित कारवाई होईल. मात्र, चौकशीत नाव आले नाही, तर ती करण्याचा प्रश्नच येत नाही. नाव नसेल, तर मुद्दामहून चौकशी कशी करणार,’ असा उलटप्रश्न त्यांनी केला.
Manikrao Kokate: ‘तो’ विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका
‘शहरातील वर्तुळाकार मार्गाबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होईल. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळसादंर्भात बैठक झाली आहे. कोणताही मोठा प्रकल्प करताना स्थानिकांचा विचार करावा लागतो. पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करावे लागते,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.