दाट धुक्याचा फटका स्टार एअर कंपनीच्या विमानाला बसला. स्टार एअर कंपनीच्या एस ५-१८३ या विमानात जवळ सत्तर प्रवासी होते . वैमानिकानं २ वेळा लॅण्डिंगचा प्रयत्न केला, मात्र धुक्यामुळे त्याला तसं करता आलं नाही.तिसऱ्या प्रयत्नात विमानाचं लॅण्डिंग झालं आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला