Jitendra Awhad vs Dhananjay Munde: बूथवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र या निवडणुकीत २०१ बूथवर हल्ले झाले, तर १०१ बूथ बळकावण्यात आले,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी केला.
परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी-शप पक्षाचे राजेसाहेब देशमुख निवडणूक लढवली होती. यात देशमुख यांचा एक लाख ४० हजार मतांनी पराभव झाला होता. या पराभवाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर देशमुख यांनी हा आरोप केला आहे. ‘परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. मतदारांनी फक्त बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मत देण्याचे काम एक गँग करत होती,’ असा आरोप राष्ट्रवादी-शप पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
JNPAहून पुणे हायवे १० मिनिटांत; दोन बोगद्यांसह २९०० कोटींचा प्रकल्प, कसा असेल महामार्ग?
परळी विधानसभा मतदारसंघात एकूण ३९६ बूथ असून उच्च न्यायालयाने त्यापैकी १२२ बूथ अतिसंवेदनशील असल्याचे म्हणत अतिरिक्त सुरक्षा पूरवा असे म्हटले होते. या बूथवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र, या निवडणुकीत २०१ बूथवर हल्ले झाले होते. तर १०१ बूथ बळकावण्यात आले होते, असा आरोपही आव्हाड यांनी केला.
Pune IT Girl Murder: धारदार चाकूने शुभदावर वार, तरुण म्हणतो तिला मारायचं नव्हतं पण…, दोघांत नेमकं काय घडलेलं?
‘निवडणूक आयोग हा बेशरम लोकांचा अड्डा झाला असून तो सत्ताधाऱ्यांना मदत करीत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना आमचे आव्हान आहे की, त्यांनी बूथ बळकावण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण द्यावे. जितक्या बूथवरील सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध असेल तर जनतेला दाखवावे,’ असे विधानही त्यांनी केले.