Shiv Sena Shinde Group: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर कांबळे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शुक्रवारी (दि. १०) शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत धनुष्यबाण हाती घेतले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाही शिवसेनेच्या शिंदे गटा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर कांबळे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शुक्रवारी (दि. १०) शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले, तरी विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल सुरू असून, सत्तेसोबत जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला घवघवीत यश मिळाले असून, शिंदे गटाकडे शहरविकासाचे नगरविकास हे महत्त्वाचे खाते आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे येणाऱ्यांचा ओढा आता वाढत चालला आहे.
Pune IT Girl Murder: धारदार चाकूने शुभदावर वार, तरुण म्हणतो तिला मारायचं नव्हतं पण…, दोघांत नेमकं काय घडलेलं?
येत्या २२ जानेवारी रोजी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयात दाखल याचिकेवर सुनावणी होत असून, त्यानंतर महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान बनल्या असून, अस्तित्व टिकविण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे सत्रही सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सातपूर विभागातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव, तसेच मनसेचे बाजीराव दातीर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यानंतर आता काँग्रेसची दीर्घ परंपरा लाभलेले समीर कांबळे आणि नाशिक पूर्व विभागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे, रवी पगारे यांनी मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाचे मुख्य नेते शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी सचिव तथा खासदार नरेश म्हस्के, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, योगेश म्हस्के, संजय तुंगार आदी उपस्थित होते.
परळीत बोगस मतदान; मतदारांच्या बोटाला शाई, ती गॅंग बटण दाबायची, VIDEO शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा आरोप
मोठ्या ‘इनकमिंग’चा दावा
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा महाविकास आघाडीतील नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यात पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार असल्यामुळे ‘मविआ’तील अनेक बडे नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्यात ठाकरे गटातील अनेक बडे नेतेही लवकरच पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. हे पदाधिकारी भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. परंतु, भाजप आणि शिंदे गटाकडून मात्र या पदाधिकाऱ्यांना विरोध केला जात आहे. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर पक्षात ‘इनकमिंग’ होणार असल्याचा दावा उपनेते बोरस्ते यांनी केला आहे.