• Sat. Jan 11th, 2025
    भर ट्रॅफिकमध्ये कार चालकाला रक्तबंबाळ केलं, पत्नी आणि मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पुण्यातील संतापजनक घटना

    Family Beaten by Two in Pune Mundhwa : पुण्यातील मुंढवा इथे एका कुटुंबाला दोघांडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. भर ट्रॅफिकमध्ये बाप-लेकाने केलेल्या या कृत्याने संताप व्यक्त होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आदित्य भवार, पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढवा परिसरात दोन जणांकडून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यावरुन वाद निर्माण झाला. ट्रॅफिकमध्ये हॉर्न का वाजवला असं म्हणत दोघांनी आई, वडील आणि मुलीला मारहाण केली आहे. या मारहाणीत व्यक्तीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला मारहाणीत रक्तबंबाळ करण्यात आलं. पीडित व्यक्तीला दोघांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगी सोडवण्यासाठी आल्या, मात्र त्या दोघींनाही आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंढवा येथील सीएनजी पेट्रोल पंप कार्निवल हॉटेल इथे हा प्रकार घडला.
    Kalyan News : ५०० रुपयांसाठी भावावरील प्रेम विसरला, एक चूक अन् त्याने धाकट्याला संपवलं, कल्याण हादरलं

    काय आहे नेमकं प्रकरण?

    गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राजेश वाघचौरे हे त्यांच्या कुटुंबासोबत कोरेगाव पार्क दिशेने जात होते. त्यावेळी मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर ट्रॅफिक होतं. त्यावेळी राजेश वाघचौरे (५०) यांनी त्यांच्या कारचा हॉर्न वाजवला. ट्रॅफिक असतानाही हॉर्न का वाजवला याचा राग आल्याने राजू गायकवाड आणि शुभम गायकवाड या आरोपींनी त्यांच्या गाडीतून उतरुन वाघचौरे यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर वाद घालत त्यांना फायटर सारख्या हत्याराने आणि शस्त्राने मारहाण करत, जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
    Pune News : बिल्डरने जमीन हडपली, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा पुण्यातील कुटुंबाचा निर्णय
    शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड या बाप-लेकाने फायटरने मारहाण केल्यानंतर, वाघचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारला, कारची काच फोडली. राजेश यांना मारहाण करत असल्याने त्यांची पत्नी सुवर्णा राजेश वाघचौरे आणि मुलगी संस्कृती राजेश वाघचौरे या त्यांना वाचवण्यासाठी आल्या. त्या दोघींनाही बेदम मारहाण केली. त्यांच्या छातीवरती लाथा-बुक्क्यांनी मारून, पोटात लाथा मारून बेदम मारहाण केली.

    भर ट्रॅफिकमध्ये कार चालकाला रक्तबंबाळ केलं, पत्नी आणि मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पुण्यातील संतापजनक घटना

    हा प्रकार मुंडवा पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा आणि डीबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed