• Sat. Jan 11th, 2025
    सततच्या आरोपानंतर धनंजय मुंडे थेट छगन भुजबळांच्या भेटीला, पडद्यामागील घडामोडींना वेग

    Dhananjay Munde News : राज्यभर संतापाचे वातावरण आहे. संतोष देशमुख हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अनेक गंभीर आरोप सातत्याने केली जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही केली जातंय. त्यामध्येच आज धनंजय मुंडे हे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेले. ज्यानंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले असून खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या मुख्यालयात देत आत्मसर्मपण केले. वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यापासून सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे.

    धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे काहीच बोलत नव्हते. धनंजय मुंडे यांची पाठराखण छगन भुजबळांकडून करण्यात आली. पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत राजीनामा मागणे योग्य नसल्याची थेट भूमिका ही छगन भुजबळ यांनी घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांच्याकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट भूमिका ही मांडण्यात आली. सुरेश धस यांच्याही समाचार घेताना दादा दिसले.
    राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार; सुरेश धसांचा खळबळजनक दावा, चर्चांना उधाणसंतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलेले असतानाच आता धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतलीये. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आता विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतंय. छगन भुजबळांच्या भेटीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की, खात्याच्या कामकाजासंबंधी मार्गदर्शन घेतले. या भेटीचे काही फोटोही पुढे आल्याचे बघायला मिळतंय. राज्यात संतोष देशमख यांच्या हत्येनंतर परत एकदा मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष हा बघायला मिळतोय.

    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मराठा समाजाकडून केली जातंय. ओबीसी समाज देखील आता आक्रमक झाल्याचे दिसतंय. यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीला महत्व आहे. छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले होते. राज्यात ओबीसी नेत्यांना मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचा आरोप हा सातत्याने केला जात असल्याचे बघायला मिळतंय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed