Devendra Fadnavis News : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशाबद्दल मोठे भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. लोकसभेच्या पराभवाबद्दल त्यांनी नेमके काय घडले हे अगदी स्पष्टपणे नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, म्हणावे तसे यश लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळाले नाही. दुसरीकडे लोकसभेत महविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. आता पहिल्यांचा लोकसभा निवडणुकीच्या अपयशावर बोलताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर खुलासा केलाय. ते यावेळी लोकसभेच्या निवडणुकीबद्दल बोलले आहेत.
सततच्या आरोपानंतर धनंजय मुंडे थेट छगन भुजबळांच्या भेटीला, पडद्यामागील घडामोडींना वेगदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकसभेचा निकाल आमच्यासाठी धक्का होता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून फेक नरेटिव्ह निर्माण करण्यात आला. लोकसभेवेळी आम्ही अतिआत्मविश्वासात होतो. लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर पहिल्यांदाच बोलताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. सत्तेत आले पाहिजे हे शिंदेंना सांगितल्याचे फडणवीसांनी म्हटले. मला बदल्याचं राजकारण करायचे नसल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भेटतात ही राजकिय परंपरा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनीही लाडक्या बहिणींचे आभार मानले. लाडकी बहीण योजनेचा आम्हाला फायदा झाल्याचेही यांनी मान्य केले. लाडकी बहिणी योजनेनंतर विधानसभेत महिलांनी महायुतीला मोठ्या संख्येने मतदान केल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वीच सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक करण्यात आले होते. ज्यानंतर उबाठा गटाकडून देवेंद्र फडणवीस यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले होते.