मोक्का प्रकरणी येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे हा जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झाला. एवढंच नाही तर परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.. ‘आता बाप बाहेर आलाय’, ‘बॉस बाहेर आलाय’ असं म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांनी पुन्हा शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पुन्हा पुणे पोलिसांवर टीका करण्यात आली. पण या रॅलीच्या व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच पोलिसांनीही खाक्या दाखवल्या आणि या गुंडांची धिंड काढली.