• Fri. Jan 10th, 2025

    भाजपचा विजयी आमदार पवार गटाकडून लढायला तयार होता, काँग्रेसने १७ दिवस घोळ घातला, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

    भाजपचा विजयी आमदार पवार गटाकडून लढायला तयार होता, काँग्रेसने १७ दिवस घोळ घातला, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

    Sanjay Raut Press Conference : मुंबईमधील महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, जागावाटपाची प्रक्रिया उशिरा झाली आणि त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना अपुरी तयारीची संधी मिळाली. विशेषत: कोल्हापूर उत्तरची जागा महत्त्वाची होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपाचा वाद सर्वांना पाहिला. अगदी शेवटच्या दिवासापर्यंतही मविआचे जागावाटप सुरू होते. यावरून माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी नाना पटोले आणि संजय राऊतांमधील वादाबाबत भाष्ये केलं. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटपाची लांबलं का आणि कोणामुळे वडेट्टावारांना माहिती असावं असं राऊत म्हणाले.

    जागावाटपाची प्रोसेस लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का आणि कोणामुळे हे विजय वडेट्टावारांना माहिती असावं. शरद पवार, जयंत पाटील आणि आम्ही शिवसनेचे सगळे होतो. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप संपलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये विलंबाने जागावाटप झाल्यावर एक अस्वस्थता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. महायुतीचे जागावाटप अगोदर झाले होते. विजय वडेट्टीवारांची जा वेदाना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात त्या स्वीकारल्या पाहिजेत. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं हे आम्हाला आता कळत आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

    काँग्रेसला सर्वात जास्त जागा होत्या पण सर्वात कमी जागा निवडून आल्या. जागावाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. वडेट्टीवारही जागावाटपामध्येही होते. विदर्भातील ज्या जागा त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असतं तर बरं झालं असतं. ज्या आता ते हरल्या आहेत. चंद्रपूरचे किशोर जोरगेवार यांनी शरद पवार गटाकडून लढायला तयार असल्याचं पत्र दिलं होतं. शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे वारंवार सांगत होते ती जागा सोडा पण त्यांनी ऐकलं नाही. १७ दिवस त्या जागेवर घोळ घातला, त्यावेळी जोरगेवार हे भाजपमध्ये गेले निवडून आले. अशा अनेक जागा असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

    काही लोकांना वाटत होत आम्हीच जिंकू,आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. देशातील वातावरण बदललं आहे, पण आमचं म्हणण होतं की आपण एकत्रित जागा लढवू. या सगळेच जबाबदार आहेत. कोल्हापूर उत्तरची जागा आग्रहाने मागत होतो. शिवसेनेने सहावेळा जिंकली होती. ती जागा आमच्याकडे आले असती तर जिंकलो असतो. कोणाला तरी वाटत होतं की कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून मुख्यमंत्रिपद हवं होतं. काँग्रेस केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही, असंही राऊत म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed