• Thu. Jan 9th, 2025
    Chhatrapati Sambhajinagar: कारमध्ये गॅस भरताना गॅस किटचा स्फोट, मुलामुळे बाप थोडक्यात बचावला

    Chhatrapati Sambhajinagar Explosion while Filling Gas: गॅस रिफिलिंग करताना गॅस भरणाऱ्याला याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र ही गॅस भरणे वैध होतं का? आवैध असा सवाल उपस्थित केला जात आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    हायलाइट्स:

    • कारमध्ये गॅस भरताना गॅस किटचा स्फोट
    • सिल्लोडच्या आझाद नगरमधील घटना
    • मुलामुळे बाप थोडक्यात बचावला
    Lipi
    सिल्लोड गॅस भरताना स्फोट

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एका कारमध्ये गॅस भरताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात गॅस भरणाऱ्या वडील आणि मुलांपैकी एक मुलगा गंभीर जखमी झाला असून एक बकरी मरण पावली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आझाद नगर येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात जखमी झालेल्या जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शेख आझम नबी शेख (35), नबी अमीर शेख (56) आणि शेख असद अकील (12, रा. आझाद नगर) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आजम, नबी आमिर शेख हे एका कार मध्ये एम एच ०९ जी ५७०० क्रमांकाच्या वाहनात गॅस भरत होते. सिलेंडर भरत असताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरला गेला. यामुळे गॅस किटचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कारने पेट घेतला. आजम शेख हे वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आले असता यावेळी गाडीतून उतरताना तेही भाजले गेले. स्थानिकांनी वाहनाची आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. या अपघातात पिता पुत्र एक मुलगा जखमी झाला आहे तर एक बकरी मरण पावली आहे.
    पुण्यात मुळशी पॅटर्न? शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याची तयारी, सगळं ठरलं अन्… धक्कादायक माहिती समोर

    गॅस रिफिलिंग करताना गॅस भरणाऱ्याला याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र ही गॅस भरणे वैध होतं का? आवैध असा सवाल उपस्थित केला जात आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकारी डॉ.राम मोहिते यांनी तात्काळ जखमींवर प्राथमिक उपचार करून तिघांना छत्रपती संभाजी नगर शहरातील घाटी रुग्णालयात पाठवले अशी माहिती डॉ.राम मोहिते यांनी दिली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed