• Thu. Jan 9th, 2025
    Mumbai News: झोपड्यांतील गाळेधारकांनाही कर; मालमत्ता करदेयके पाठवण्यास BMCकडून सुरुवात

    Mumbai News: सध्या झोपडपट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांना मालमत्ता कर लागू नाही. आता सर्वेक्षणाबरोबरच जे व्यावसायिक गाळेधारक आढळत आहेत, त्यांना मालमत्ता करदेयकही हाती सोपविले जात आहे. महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने वॉर्डस्तरावरही सर्वेक्षणासह याप्रकारे नोटीसही बजावून करवसुलीला सुरुवात केली आहे.

    हायलाइट्स:

    • निवडणुका संपताच निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात
    • महापालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सवलतींचे मोल घेणार
    • वर्षाला २०० कोटींहून अधिक कर जमा होण्याची शक्यता
    महाराष्ट्र टाइम्स
    bmc new1

    मुंबई : उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून मुंबईत असलेल्या झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांनाही मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर लागू करण्याचे नियोजन सुरू होते. सध्या झोपडपट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांना मालमत्ता कर लागू नाही. आता सर्वेक्षणाबरोबरच जे व्यावसायिक गाळेधारक आढळत आहेत, त्यांना मालमत्ता करदेयकही हाती सोपविले जात आहे. महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने वॉर्डस्तरावरही सर्वेक्षणासह याप्रकारे नोटीसही बजावून करवसुलीला सुरुवात केली आहे.मुंबईत वर्षागणिक झोपड्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या आणि खासगी जमिनीवर निवासी तसेच व्यावसायिक वापराच्या झोपड्या असल्याची नोंद आहे. या झोपड्यांना मुंबई महापालिकेकडून मुलभूत सेवा, सुविधाही पुरवल्या जातात. मात्र त्यांना मालमत्ता कर लागू झालेला नाही. झोपडपट्यांमध्ये किमान व्यावसायिक वापर होत असलेल्या गाळ्यांनाही मालमत्ता कर लागू करण्याचा विचार अनेक महिन्यांपासून मुंबई महापालिका करत होती. त्यामुळे झोपड्यांमधील जागेच्या क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारला जावा, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिल्या होत्या. अशा झोपड्यांचे सर्वेक्षण हाती घेतले. राज्य सरकारच्या अध्यादेश क्रमांक २ फेब्रुवारी २०२२ नुसार ५०० चौरस फूट किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिका आणि गाळेधारकांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. मात्र ही सवलत निवासी वापराच्या गाळेधारकांसाठी असली तरीही व्यावसायिक गाळ्यांसाठी ही सवलत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेसमोर व्यावसायिक गाळ्यांना मालमत्ता कर लागू करण्याचा पर्याय खुला होता.
    लग्नाच्या १० वर्षांनी लेक जन्मला, पण काळानेच हिरावला, ट्रकच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू, कल्याण हादरलं
    सध्या मुंबई महापालिकेत नगरसेवक नाहीत. तर प्रशासक असल्याने त्याला विरोध होण्याचेही कारण नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी मुंबईतील झोपड्यांमध्ये असलेल्या व्यावसायिक गाळ्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी महापालिकेने धडपडही सुरू केली होती. परंतु निवडणुकीचे बिगुल वाजताच हालचाली थांबल्या होत्या. आता निवडणुका संपताच २४ वॉर्डमध्ये सर्वेक्षण घेतानाच व्यावसायिक गाळेधारकांना मालमत्ता कराची नोटीस बजावण्यास त्याची वसुलीही केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्षाला २०० कोटींहून अधिक कर जमा होण्याचा अंदाज महापालिकेकडून वर्तविण्यात आला आहे.

    रेडी रेकनरनुसार आकारणी
    वॉर्डस्तरावर व्यावसायिक गाळेधारकांचे सर्वेक्षण होतानाच गाळेधारकांकडे कागदपत्रे मागितली जात आहेत. यामध्ये दुकान किती चौरस फुटांत वसले आहे, त्याचे आकारमान इत्यादी माहिती प्राप्त होताच रेडी रेकनर दरानुसार मालमत्ता करवसुलीचे काम केले जात आहे. महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्डमध्ये १ हजार ४७१ दुकानांचे सर्वेक्षण केले असून ४३२ दुकानदारांना मालमत्ता कराचे देयक पाठवण्यात आले आहे.
    ‘राष्ट्रवादी-शप’ला गळती? शरद पवारांच्या पक्षातील खासदार, आमदार फुटण्याच्या चर्चेने खळबळ
    २०१७मधील निर्णय मागे
    झोपडपट्टीधारकांना सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असल्याने २०१७मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात झोपड्यांनाही मालमत्ता कर आकारण्याची सूचना केली होती. मात्र त्याला विरोध झाल्याने उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय मागे पडला. आता झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
    Cashless Treatment Scheme: अपघातग्रस्तांना मिळणार कॅशलेस उपचार; नितीन गडकरींची मोठी घोषणा, फक्त एकच अट…
    झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांकडूनही मालमत्ता करवसुलीचे नियोजन होते. त्यासाठी सर्वेक्षणही हाती घेण्यात आले. आता करवसुलीही केली जात आहे. – विश्वास शंकरवार, सहआयुक्त, करनिर्धारण आणि संकलन खाते, मुंबई महापालिका

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed