बुलढाणा : टक्कल व्हायरस घटनेनंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर! टक्कल पडणाऱ्यांची संख्या पोचली ५१ वर
वाढत्या तक्रारीxची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. चर्मरोग तज्ञांची पथकंही दाखल झाली असून, प्रथम कठोरा बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे .फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले. पाणी आणि स्किनचे नमुने घेण्यात आले असून, तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली, अहवाल प्राप्त होताच नेमके कारण पुढे येईल.