Ajit Pawar: शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी चर्चा असताना, गेल्या काही दिवसांपासून तशा घडामोडी सुरु असताना आता अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आरोप होत आहेत.
खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल खासदारांनी थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार केली. यानंतर सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांना फोन केला. खासदारांच्या फोडाफोडीबद्दल त्यांनी पटेलांना चांगलंच सुनावलं. पुन्हा असले प्रयत्न करु नका, असं सुळेंनी पटेलांना सांगितलं.
अजितदादा आधी पटेलांच्या घरी, मग गुप्तता पाळत शहांच्या भेटीला; बैठकीत चर्चा नेमकी कशावर?
संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एनडीएसोबत कायम ठेवण्यासाठी भाजपकडून खासदार फोडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ‘शरद पवार, उद्धव ठाकरे सोबत येताहेत, अशा धमक्या देऊन नितीश यांना सोबत ठेवलं जात आहे,’ असं आव्हाड म्हणाले.
बिहारमध्ये भाजप शिंदे पॅटर्न राबवण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्याची भाजपची तयारी नाही. त्याची जाणीव झाल्यानं नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. केंद्रातील भाजपची सत्ता ‘नानी फॅक्टर’ अर्थात नायडू-नितीश यांच्यावर अवलंबून आहे. भाजपकडे २४० खासदार आहेत. नायडूंकडे १६, नितीश यांच्याकडे १२ खासदारांचं बळ आहे. त्या जोरावरच केंद्रात भाजप सत्तेत आहे.
सलमानच्या हत्येचा प्लान होता, पण…; तपासातून मोठा उलगडा; बॅगेत बंदूक घेऊन ‘ते’ फिरत होते
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, त्या दोघांना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपनं ऑपरेशन २७२ सुरु केल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या ८ आणि उद्धव ठाकरेंच्या ९ खासदारांवर भाजपची नजर आहे. दोघांचे मिळून १७ खासदार होतात. आपल्या गोटात २७२ खासदार कसे येतील याची चाचपणी भाजपनं सुरु केली आहे. आधी भाजपचं लक्ष्य २६० होतं. पण महाराष्ट्रात विधानसभेला मिळालेलं यश पाहता भाजपनं आता २७२चं लक्ष्य ठेवलं आहे.