Man Ends Life Due to Credit Card Loan : लातूरमध्ये एका तरुणाने क्रेडिट कार्डच्या कर्जामुळे आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
सुशील बोलसुरे हा लातूर जिल्ह्यातील निलंगा तहसीलमध्ये येणाऱ्या सिंदखेड गावात राहणारा होता. सुशील मूळचा सिंदखेडचा होता, पण पुण्यातील एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता. यावेळी त्याने एसबीआय बँकेतून क्रेडिट कार्डवर १ लाख २७ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण कर्ज परत न केल्याने एसबीआयचे बँक कर्मचारी सुशीलला फोन करुन कर्ज परत करण्यासाठी दबाव आणत होते. सुशीलला दररोज बँकेतून कॉल कर्ज परत करण्यासाठी कॉल येत असल्याने तो अतिशय त्रासला होता.
दादर स्थानकात तरुणीचे केस कापल्याची भयंकर घटना, आरोपी ताब्यात; दिलं धक्कादायक कारण
तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सुशील क्रेडिट कार्डवर कर्ज घेतल्याची बाब त्याच्या मित्रांनाही समजली होती. यामुळे मित्रांमध्ये होणाऱ्या बदनामीमुळे तो मानसिक तणावात होता. याचदरम्यान तो पुण्यातून त्याच्या गावी सिंदखेडमध्ये एका उत्सवासाठी आला होता. गावी आल्यानंतरही त्याला सतत बँकेकडून कॉल येत होते. यालाच कंटाळून सुशीलने ६ जानेवारी रोजी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. क्रेडिट कार्डचे हप्ते भरता न आल्याने बँकेच्या सततच्या कॉल, कर्जाच्या ओझ्याखाली त्याने आयुष्याची अखेर केली.
उसाची तोडणी सुरू होती, रात्री अंधारात भयंकर घडलं; शेतातच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, शहरात हळहळ
या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी सुशीलचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी निलंगा शहरातील सरकारी रुग्णालयात पाठवला. या आत्महत्येप्रकरणी निलंगा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून तगादा, पुण्यात वेटरची नोकरी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, लातूरमध्ये हळहळ
दरम्यान, क्रेडिट कार्डचं कर्ज फेडता न आल्याने, सतत येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या दबावाला कंटाळून आतापर्यंत अनेकांनी मोठ्या मानसिक त्रासाचा सामना केला आहे. सुशील देखील याच मानसिक त्रासाला कंटाळून, कर्ज फेडता न आल्याने नैराश्यात गेला आणि टोकाचं पाऊल उचचलं. त्याच्या अशाप्रकारे जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.