Supriya Sule calls Praful Patel : सुप्रिया सुळे या प्रकारामुळे चिडल्या असून त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना फोन करुन याबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे.
तटकरेंवर जबाबदारी
शरद पवार गटातील खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. अजितदादांनी ‘ऑपरेशन घड्याळ’ची जबाबदारी सुनील तटकरे यांच्या खांद्यावर टाकली आहे. तटकरेंनी सात खासदारांना संपर्क केला आहे. सुप्रिया सुळे वगळता सात जणांची त्यांनी स्वतंत्र भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
Raj Thackeray : शिंदेंमुळे नुकसान, ‘शिवतीर्थ’वरील बैठकीत राज ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय, महापालिका निवडणुकांपूर्वी गेम फिरणार?
सात जणांचा निर्णय काय?
केंद्र सरकारला अधिक स्थैर्य देण्याचा अजित पवारांकडून प्रयत्न होत आहे. त्यानुसार सुनील तटकरे यांनी सात खासदारांना सोबत येण्याची गळ घातली. आमच्यासोबत सत्तेत सामील व्हा, मात्र याबद्दल इतक्यात कोणालाही काही सांगू नका, असंही तटकरेंनी खासदारांना सांगितलं. मात्र सातही जणांनी ऑफर धुडकावली. इतकंच नव्हे, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना ऑफरबद्दल सांगितलं.
Supriya Sule : सोबत या, तटकरेंची ऑफर, शरद पवारांच्या ७ खासदारांचा एकमुखी निर्णय, सुप्रिया सुळे चिडल्या, प्रफुल्ल पटेलांना कॉल करुन म्हणाल्या…
हा प्रकार ऐकून सुप्रिया सुळे यांचा पारा चांगलाच चढला. प्रफुल पटेल यांना फोन करुन सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न का करत आहात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray : पुण्यात ठाकरे गटाला भगदाड, पाच नेत्यांनी शिवबंधन सोडलं, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
लंकेंनी दावा फेटाळला
दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी असा संपर्क झाल्याचे वृत्त नाकारले. आम्हाला कुठलीही ऑफर आलेली नाही, आणि तसा निर्णयही होणार नाही. राजकारणात कुठल्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं, सत्ता नसतानाही संघर्ष करण्याची तयारी ठेवायची असते, असं सांगत सुनील तटकरेंना मी भेटलो नाही, इतरही कुणी भेटलं नाही, असा दावा लंकेंनी केला. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र पवार गटाचे काही आमदार खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे.