Nandurbar News : गावदिवाळीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जाणाऱ्या दोघा युवतींना अंधाराचा फायदा घेत रस्त्यात गाठून दोघांनी दुचाकीवर बसवून कोठली गावापासून जवळ असलेल्या एका पपईच्या शेतात नेले. त्या ठिकाणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा दोघांनी प्रयत्न केला. मात्र तेथून अल्पवयीन मुलगी त्या दोघांच्या तावडीतून सुटली
नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील १९ वर्षीय युवती व तिची १४ वर्षीय मैत्रीण या दोघी कोठली गावदिवाळीचा कार्यक्रम असल्याने ३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास तो कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना, कोठली ते निंभोणी गावाच्या रस्त्यादरम्यान असलेल्या आश्रमशाळेच्या गेटजवळ उभा असलेल्या रोहित महेंद्र वळवी आणि सुनिल सुपा वळवी दोघे राहणार कोठलीचा बारीपाडा ता. नंदुरबार या दोघांनी या युवतींना गाठले.
रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेत दोन्ही संशयितांनी युवती व तिच्या मत्रिणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर कोठलीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पपईच्या शेतात नेले. त्याठिकाणी अत्याचाराचा दोन्ही संशयितांनी प्रयत्न केला. मात्र त्यावेळी १४ वर्षीय अल्पवयीन युवती धक्का देऊन त्यांच्या तावडीतून सुटली. त्यानंतर संशयित दोघांनी अल्पवयीन १९ वर्षीय युवतीवर अत्याचार केला.
याप्रकरणी १९ वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात रोहित महेंद्र वळवी, सुनिल सुपा वळवी या दोघांविरुध्द भा.न्या.सं.७० (१)/ ५७, ७६, ३ सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ प ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कोठली गावात जाऊन रात्रीच संशयितांना अटक केली. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक बडवट, पोलीस उपनिरीक्षक वळवी, असई राजेंद्र दाभाडे, पोकॉ. विपुल पाटील, असई. वंतू गावित यांच्या पथकाने केली.