• Wed. Jan 8th, 2025
    रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाची धडक, पादचाऱ्याचा जागीच करुण अंत

    Satara Accident News: धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उपकेंद्रात पाठवून दिला.

    हायलाइट्स:

    • अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार
    • मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमाराची घटना
    • साताऱ्यातील धक्कादायक घटना
    Lipi
    सातारा अपघात बातम्या

    संतोष शिराळे, सातारा : पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर कोल्हापूर नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचारी जागीच ठार झाला. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतूक सर्व्हिस रस्त्याने सुरू आहे. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे – बंगळुरू महामार्गावरील कराड ते सातारा या लेनवर रस्ता ओलांडताना पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
    Raj Thackeray : शिंदेंमुळे झालं हो सगळं! राज ठाकरेंच्या जवळच्या माणसाने बॉम्ब फोडला, दीड तासांच्या बैठकीत मोठी खलबतं

    धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उपकेंद्रात पाठवून दिला. दरम्यान, कोल्हापूर नाक्यावर झालेल्या अपघातानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा शोधदेखील घेतला जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed