• Wed. Jan 8th, 2025
    आई काय झालं? का रडतेयस? माऊलीचा हुंदका, धाकट्या लेकाच्या लग्नाआधी मातापित्याचं टोकाचं पाऊल

    Nashik Shah Couple Suicide : रक्षा जयेश शहा (वय ५५) व त्यांचे पती जयेश शशिकलाल शहा (वय ५८) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक : धाकट्या मुलाच्या लग्नापूर्वी एका कार्यक्रमानिमित्त एकत्रित आलेल्या कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दाम्पत्याने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. नाशिकमधील टिळकवाडी येथील यश कृपा बंगल्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. टोकाचं पाऊल उचलण्याआधी आईने मोठ्या मुलाला फोन केला होता, या कॉलमुळे लेकरांचं आयुष्यच बदललं.

    रक्षा जयेश शहा (वय ५५) व त्यांचे पती जयेश शशिकलाल शहा (वय ५८) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम असून नातलगांकडे चौकशी करीत सरकारवाडा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर वरमाय आणि वरपित्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर नवरदेवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    नेमकं काय घडलं?

    सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षा व जयेश यांनी रविवारी (दि. ५) रात्री अकरा वाजता राहत्या बंगल्यात विषारी औषध प्राशन केल्याचे त्यांच्या मुलाने बघितले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्यानंतर सोमवारी (दि. ६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.
    Dharashiv Crime : धाराशिवमध्ये रक्तरंजित सकाळ, पारधी समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारी, चौघांचा मृत्यू

    खोलीत चिठ्ठी नाही

    सरकारवाडा पोलिसांनी दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी सापडलेली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून, आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झालेला नाही.

    Nashik Couple Suicide : आई काय झालं? का रडतेयस? माऊलीचा हुंदका, धाकट्या लेकाच्या लग्नाच्या तोंडावर वरमाय-पित्याचं टोकाचं पाऊल

    दरम्यान, दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले असून, त्यापैकी एक विवाहित आहे. मोठा मुलगा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, धाकट्याचे २६ जानेवारी रोजी लग्न नियोजित आहे. त्याच्या लग्नानिमित्त रविवारी एका धार्मिक विधीसाठी त्यांचे नातलग एकत्र आले.
    Torres Scam: ११ टक्के परताव्याचं आमिष, लोकांनी लाखो गुंतवले अन् टोरेसचं ऑफिस रातोरात बंद, शिवाजी पार्कला गुंतवणूकदारांचा ठिय्या

    बंगल्यात नातेवाईक जमले, आईबापाने आयुष्य संपवलं

    सुमारे वीस जणांनी बंगल्यात एकत्रित जेवण केले. त्यानंतर मोठा मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेला व धाकटा देवदर्शनासाठी गेला होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास रक्षा यांनी मोठ्या मुलाला फोन केला, तेव्हा त्यांचा आवाज हुंदका लागल्यासारखा येत होता, असा दावा नातलगांनी पोलिसांसमोर केला. तर काही वेळात मोठा मुलगा घरी पोहोचल्यानंतर त्याने आई वडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याचे बघितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed